20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार
schedule15 Feb 26 person by visibility 89 categoryक्रीडा
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक २०२६: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानी संघ १८ षटकांत ११४ धावांवरच मर्यादित राहिला. या विजयासह भारत सुपर ८ मध्ये पोहोचला.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला. पाकिस्तानच्या कर्णधाराने आज नाणेफेक जिंकली आणि त्यांची मजबूत फलंदाजी लक्षात घेऊन त्याने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. भारताने दिलेल्या १७५ धावांच्या प्रत्युत्तरात आज पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. या धावांचा पाठलाग करताना उस्मान खानने पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.