SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश

schedule15 Feb 26 person by visibility 117 categoryशैक्षणिक

कसबा बावडा : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील श्रेयस माने आणि निकिता कोळेकर यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’ या कौशल्य प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांना २५,००० रुपये रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

युवकांमधील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांना चालना देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’सारख्या वेगळ्या व आव्हानात्मक कौशल्य प्रकारात सुवर्णपदक मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे प्रादेशिक फेरी तसेच विशेष बूटकॅम्प प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.

या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी, प्रा. सतीश रणभिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes