SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

जाहिरात

 

भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल

schedule15 Feb 26 person by visibility 176 categoryउद्योग

▪️आज होणार समारोप,प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
▪️एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी
▪️३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे प्रदर्शनाचे आकर्षण
▪️१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा आकर्षण


कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांनी आणि शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती.पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी,महापूर मेरी वेदर मैदानावर लोटला होता.याचबरोबर शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण.

कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी आम्हा शेतकऱ्यांना नवनवीन कृषी विषयक माहिती.शासनाच्या वतीने वेगवेगळ्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळते.शिवाय विविध शेती तज्ञ यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले ज्याद्वारे आम्हाला शेतीची माहिती मिळाली असल्याचे भेट देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.तीन दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी झाली आहे.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
आज तिसऱ्या दिवशी सुमारे १२  कोटींची उलाढाल ही झाली आहे.आज १६ फेब्रुवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने  दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
आज कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

▪️भीमा कृषी प्रदर्शनात रिंगन सोहळा आयोजित पार पडला. ज्यामध्ये गोमाता पूजन माजी खासदार अण्णासाहेब जोले,खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परीक्षक डॉ.सुनील काटकर, डॉ.शिंदे,किरण रणदिवे,इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.

आज प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक,माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी भेट दिली.आजही शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने पाच हजार शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.
आज १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम झाला.तर १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.
      
शतक वीर हिंदकेसरी हरण्या बैल पाहण्यासाठी गर्दी

शतक वीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल कृषी प्रदर्शनात दाखल झाला असून त्याला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड अफलातून गर्दी केली आहे. लोकांची भिंत म्हणून संबोधला जाणारा हा बैल जुना बुधवार पेठ येथील संदीप विश्वास पाटील यांचा आहे.तो अकरा वर्षाचा असून त्याने शंभर वेळा एक नंबरची बक्षीस मिळवली आहेत. १३९ शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे.१७ वेळा दोन नंबरचा मानकरी ठरला आहे. तो रोज पाच लिटर दूध पितो व भरडा हिरवी वैरण खातो. वजनाने ६०० किलोचा असून त्याची शिंगे साडेतीन फूट आहेत. तर लांबी ७ फुट आहे. याच्याशिवाय दुसरा बैल शर्यतीत कोणताच नाही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ज्यावेळी मोठी शर्यत असते त्यावेळी त्याचा सहभाग असतो. दोन ट्रॅक्टर आणि पाच  मोटरसायकल त्याने जिंकल्या आहेत. एकसंभा येथे १७ लाखाचे बक्षीस मिळविलेले आहे. एकाच मैदानावर त्याने  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला आहे.

▪️तीन वर्षाची राधा गाय आकर्षण
 सचिन शिवकुमार हिरेमठ यांची तीन वर्षाची राधा गाय प्रदर्शनाची आकर्षण ठरत असून या गाईचे दूध तिरुपती देवाच्या अभिषेकासाठी वापरले जाते. आतापर्यंत तीन वेळा भीमा कृषी प्रदर्शनाची आकर्षण ठरली आहे. चेतक नावाचा तीन वर्षाचा घोडा  भीमा कृषी प्रदर्शनात चॅम्पियन ठरला आहे.चार वर्षे सहा महिने वयाचा पंजाबी काठेवाडी गुलाबी  नूखरा जातीचा आहे. 

▪️मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा  घोडा चार वर्षाचा असून त्याची उंची ६२ इंच आहे. तर ७ फूट लांबी आहे. त्याच्या तोंडावर पंचकल्यांनी पांढरा नाम असून अमोल भास्कर हे त्याचे मालक आहेत.त्यांच्याकडे तो तीन वर्षापासून आहे. हरभरा उडीद डाळ, चार लिटर दूध सकाळी संध्याकाळी पितो त्याची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. अकलूज मध्ये चॅम्पियन ठरला असून वेगवेगळ्या शेती प्रदर्शनामध्ये त्याचा सहभाग असतो.

 ▪️खास आकर्षण जनावरे पाहण्यासाठी लोकांची गर्दी
भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा, राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा खास आकर्षण

▪️देशी विदेशी भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश
स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये  फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस  प्रदर्शनात विक्री होत आहे.

तर भाज्यांमध्ये सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील  अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे  येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

▪️प्रदर्शनात अशी आहेत जनावरे,पक्षी
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या,  बोकड, असे खास आकर्षण  आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत.  परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी  आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह,  विविध जातीच्या कोंबड्या तसेच  विविध जातीचे  पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.
ज्यात अमेरिकन बेंटम बोकड  पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक  पांढरे उंदीर,  हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग  पांढरा उंदीर,टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ती आकर्षण ठरत आहेत.

▪️आज १६ फेब्रुवारी रोजी होणार समारोप

प्रदर्शनाचा भीमा कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सांगता व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ.अशोकराव माने,आ. शिवाजीराव पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, माजी आ. संजयबाबा घाडगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची  प्रमुख उपस्थिती असणार आहे

▪️आज झालेली व्याख्याने
आज १५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार यांनी सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडताना 

शेण खताविना शेती पिकेना 
माती मायेची सुपीकता जाईना 
दहा गाड्यांच्या एवजी एकही ना 
तुका म्हणे जमिनीचा कस जाईना

अशी तुकाराम महाराजांची ओवी सांगत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा त्याचबरोबर नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध होणाऱ्या व कमी खर्च असणाऱ्या तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी करणाऱ्या सेंद्रिय निविष्ठां संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.तसेच शेतीकडे व्यापारी दृष्टिकोन शाश्वत पर्यावरणाशी निगडीत उत्पादनविषयी मार्गदर्शन केले.

माजी मृदा शास्त्रज्ञ व प्रमुख प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरचे प्रा. डॉ जे.पी.पाटील यांनी सध्या बिघडलेल्या जमिनीचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी जमीन व्यवस्थापन विशेष करून सेंद्रिय घटकांचा वापर पिकांची फेरपालट व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) यांनी दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार मांडताना शेतीशी निगडीत दुय्यम दुग्ध व्यवसाय विषयी मार्गदर्शन करताना दुधाळ जनावरांची निगा  निवड व खाद्य व्यवस्थापन तसेच लसीकरण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून लंपीची लस शासनाच्या मार्फत तयार करण्यात आली आहे.तिचा उपयोग आपल्या जनावरांसाठी करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले.यावेळी युवा प्रगतशील शेतकरी युवराज तुकाराम माने राहणार कोपार्डे यांचा सन्मान करण्यात आला.

▪️उद्या १६ रोजी  होणारी व्याख्याने
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

🙏कृषी विभागाची माहिती

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्माच्या वतीने शेती उपयुक्त डेमो या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्टे योजना काय आहे याचा प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. गोशाळा कशी असावी याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड,गांडूळ युनिट दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कीटकनाशके फवारताना काय करू नये याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना यामध्ये महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक काय आहेत हे मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मातीचा नमुना कसा घ्यावा अन्नपौष्टिक तृणधान्य याबाबत माहिती मांडण्यात आली आहे.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.

भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,  वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आज शेवटचा दिवस प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.प्रदर्शनासाठी या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडेदादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे, डॉ.निवृत्ती पाटील, डॉ.सुखदेव साबळे, डॉ.अंकुश काळे,. डॉ.अजय कुरणे,डॉ.किरण उनउणे,प्रा.ऋतुराज चव्हाण, डॉ.मंगलसिंग जाधव,डॉ. वर्षा मिंड कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.


भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल : 

१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक पंधराशे रवे 
२) इंद्रायणी तांदूळ : ४१०० kg 
३) आजरा घनसाळ : २५०० kg 
४) इंद्रायणी कणी : १७००  kg
५)  रत्नागिरी २४ :  ४६००  kg
६) सेंद्रीय हळद : ६०० kg  
७) नाचणी : ९०० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १२०० kg

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes