SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीकोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआडदादरा आणि नगर हवेली: भारत देशाचा केंद्रशासित प्रदेश बनण्याचा प्रवासकरवीरमध्ये शिवसेनेचे 'बोंब मारो' आंदोलन: आयटी रिटर्नच्या निकषावरून रेशन बंद करणाऱ्या शासनाविरोधात आक्रमक पवित्रा‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्यायशिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपणकळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलीआवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता

जाहिरात

 

कळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

schedule10 Aug 26 person by visibility 216 categoryराज्य

कोल्हापूर  : मोटार वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये  दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 - जी वरील कळे ते कोल्हापूर हा रस्ता बंद करुन गगनबावडा कडून येणारी वाहतुक सांगरुळ फाटा - कुडित्रे -कोगे-पाडळी- बालिंगा मार्गे कोल्हापूरकडे तसेच कोल्हापूरकडून येणारी वाहतुक बालिंगा-पाडळी-कोगे-कुडित्रे-सांगरुळ फाटा मार्गे गगनबावडाकडे वळविण्यात परवानगी व वाहतुक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निगर्मित केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६-जी वरील कळे ते कोल्हापूर या रस्त्याच्या ईपीसी (EPC) पद्धतीने सुरू असलेल्या कामांतर्गत मौजे बालिंगा (कि.मी. ७९+५००) येथील प्रमुख पुलाचे (Major Bridge) बांधकाम प्रगतीपथावर आहे. या पुलावरील स्पॅन P1-P2 च्या स्लॅब काँक्रीटकरणाचे काम मे. व्ही.पी.एस.सी या कंत्राटदारामार्फत 10 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत नियोजित करण्यात आले आहे. या स्लॅब काँक्रीटीकरण्याच्या कामासाठी प्रस्तावित नवीन पुलावर काँक्रीट बूम प्लेसर उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन पुलावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाणार असून  कामाच्या स्वरुपामुळे पुलावरुन वाहनांची सुरक्षित वाहतूक करणे शक्य होणार नाही.

 त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes