SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीकोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआडदादरा आणि नगर हवेली: भारत देशाचा केंद्रशासित प्रदेश बनण्याचा प्रवासकरवीरमध्ये शिवसेनेचे 'बोंब मारो' आंदोलन: आयटी रिटर्नच्या निकषावरून रेशन बंद करणाऱ्या शासनाविरोधात आक्रमक पवित्रा‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्यायशिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपणकळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलीआवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता

जाहिरात

 

कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआड

schedule11 Aug 26 person by visibility 167 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्रांच्या विरोधात धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे सुरू असलेल्या एका कारखान्यातून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

 या कारवाईत एकूण ७४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तुषार लक्ष्मण येरुडकर (वय २४, रा. कबनूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आपल्या कारखान्यात पिस्टल बनवण्याचा प्रयत्न करत होता.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या सूचनेवरून, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक या भागात संशयितांवर लक्ष ठेवून होते. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने कबनूर येथील दत्तनगर भागात सापळा रचून आरोपी तुषार येरुडकर याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिक चौकशीनंतर त्याने दावतनगर येथे भाड्याने घेतलेल्या कारखान्यात बेकायदेशीर शस्त्रे आणि पार्ट लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी कारखान्याची तपासणी केली असता तेथे देशी बनावटीचे पिस्टल, २८ जिवंत राऊंड, रिकाम्या पुंगळ्या, गन पावडर आणि शस्त्र निर्मितीसाठी लागणारे स्टीलचे सुटे पार्ट आढळून आले.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याद्वारे केला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes