राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली
schedule11 Aug 26 person by visibility 125 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे व हळदी, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड असे एकूण 13 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.31 (99 टक्के), तुळशी 3.40 (98 टक्के), वारणा 30.56 (89 टक्के), दूधगंगा 22.05 (87 टक्के), कासारी 2.40 (86 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.48 (91 टक्के), पाटगाव 3.26 (88 टक्के), चिकोत्रा 1.12 (74 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.24 (100 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (34 टक्के),कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.11, सुर्वे 20, रुई 48, इचलकरंजी 46.3, तेरवाड 42.6, शिरोळ 33.6, नृसिंहवाडी 30.6 फूट इतकी पाणीपातळी आहे.