SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीकोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआडदादरा आणि नगर हवेली: भारत देशाचा केंद्रशासित प्रदेश बनण्याचा प्रवासकरवीरमध्ये शिवसेनेचे 'बोंब मारो' आंदोलन: आयटी रिटर्नच्या निकषावरून रेशन बंद करणाऱ्या शासनाविरोधात आक्रमक पवित्रा‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्यायशिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागासमोर वृक्षारोपणकळे ते कोल्हापूर मार्ग 11 ऑगस्टला बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलीआवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता

जाहिरात

 

आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी यादीला मिळणार 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता

schedule10 Aug 26 person by visibility 253 categoryराज्य

  कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार २९ ग्रामपंचायतींमध्ये बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे आवास प्लस २०२४ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात एकूण १ लाख ३६ हजार २३८ कुटुंबांची नोंद करण्यात आली आहे. सर्वेक्षणाची तालुकास्तरावर पडताळणी करण्यात आली असून, मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  या यादीला १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मान्यता देण्यात येणार आहे. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टानुसार पात्र नवीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येणार आहे. तालुकानिहाय सर्वेक्षणात आजरा ७ हजार ८९३, गगनबावडा २ हजार १८८, भुदरगड १३ हजार ४५०, चंदगड ८ हजार १९६, गडहिंग्लज १० हजार २९०, हातकणंगले १२ हजार ५०८, कागल १२ हजार ७९८, करवीर १७ हजार २६८, पन्हाळा १३ हजार ४६५, राधानगरी १४ हजार ९१०, शाहूवाडी १० हजार २८ आणि शिरोळ १३ हजार २४४ कुटुंबांचा समावेश आहे.

  बेघर, कच्च्या घरातील तसेच निराधार कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार असून, हाताने मैला उचलणारे, भिक्षेकरी, दिव्यांग, आदिम जमाती समूह आणि कायद्याने मुक्त केलेले वेठबिगार यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. पक्के घर, दोनपेक्षा अधिक खोल्या, चारचाकी वाहन, शासकीय नोकरी, आयकर भरणे, ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न अथवा जमीनधारणा यांसह निर्धारित निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांना लाभातून वगळण्यात येणार आहे.

  एकही पात्र बेघर कुटुंब वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये, यासाठी प्रक्रिया पारदर्शक व डिजिटल पद्धतीने, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या सहाय्याने राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिली.

  ग्रामसभेत यादीला मान्यता देताना लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांनी केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes