SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा आज अखेरचा दिवस

schedule30 Jun 26 person by visibility 201 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल ते  दि 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास घरफाळा करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि.1 एप्रिल ते दि.29 जून 2026 अखेर 71,008 मिळकतधारकांनी एकूण 34 कोटी 95 लाख इतकी रक्कम भरणा केलेली आहे. या सवलत योजनेमधून नागरीकांना 6 टक्के सवलत योजनेप्रमाणे 1 कोटी 52 लाख 20 हजार 589 रुपये रक्कम सवलत म्हणून देण्यात आलेली आहे.

तसेच ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केला नाही त्यांनी आपला घरफाळा भरुण या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. महानगरपालिकेमार्फत नागरीकांच्या सोईसाठी 6 टक्के सवलत योजनेचा शेवट दिवस असल्याने महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे मंगळवार, दि.30 जून 2026 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आलेली आहेत.

तरी नागरिकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes