कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्त
schedule17 Jul 25 person by visibility 240 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या पथकाने वर्षानगर, मालती अपार्टमेंट व शाहूमिल कॉलनी लकी बझार येथून प्रत्येक एक प्रमाणे 3 जनावरे जप्त केली. ही जनावरे आंबा येथील शासन अनुदानीत गो शाळेकडे पाठविण्यात आली आहेत.
प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडू नये,
अशा मोकाट जनावरे सोडणा-यावर महापालिकेच्यावतीने जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे.