SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उखळु धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी; हिरवागर्द निसर्गसौंदर्याची पर्यटकांना साद...कोल्हापूर : राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत हातगाड्या, शेड व स्टँड बोर्ड जप्तबदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया…!; कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूरकोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्तकेशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पाहणीडॉ. जब्बार पटेल यांचा उद्या विद्यापीठात मुक्त संवादपन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये देशपातळीवर यश; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवसहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळडी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवडखडकी येथे 4 ऑगस्टपासून अग्निवीर भरती

जाहिरात

 

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

schedule17 Jul 25 person by visibility 309 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे.
 
  अंतिम वर्षाच्या बी.आर्क. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये  पुणे, कोल्हापूर, मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद येथील आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील एकूण २५ नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये हाफिज कॉन्ट्रॅक्टर अँड असोसिएट्स, मुंबई, मेनहर्टझ बंगलोर, अनुपम डे असोसिएट्स मुंबई, द बॉक्स डिझाईन पुणे, डिझाईन वैन गोवा, ट्राय डिझाईन असोसिएट्स पुणे, आर्चलँड कोल्हापूर अशा नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा मिश्र स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधून ४२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

  या यशस्वी मेगा प्लेसमेंट ड्राइव्हचे समन्वयन प्रा. पूजा जिरगे, प्रा. संतोष आळवेकर आणि प्रा. तन्वी शेटके यांनी केले. अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार व ट्रेनिंग व प्लेसमेंट मकरंद काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश  मालदे,  स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes