खडकी येथे 4 ऑगस्टपासून अग्निवीर भरती
schedule17 Jul 25 person by visibility 175 categoryराज्य

कोल्हापूर : मुंबई अभियंता गट व केंद्र, खडकी (पुणे) यांच्या वतीने युनिट मुख्यालय कोटा (UHQ Quota) अंतर्गत अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती 4 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत खडकी पुणे येथे पार पडणार असून अग्निवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (ट्रेड्समन - 10वी, 8 वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुल्या श्रेणीसाठी) यांची भरती केली जाणार आहे.
भरती रॅलीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- 4 ऑगस्ट 2025- अग्निवीर खेळाडू, 5 ऑगस्ट 2025 - अग्निवीर (जीडी), 6 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025- अग्निवीर (जीडी) – मराठा, 8 ऑगस्ट 2025- अग्निवीर (जीडी) – ओआयसी व मुस्लिम, अग्निवीर (टेक्निकल) – AASC, 9 ऑगस्ट 2025 - अग्निवीर (टीडीएन) – 8 वी व 10 वी उत्तीर्ण (संगीतकार, शेफ, ड्रेसर, स्टीवर्ड, सपोर्ट स्टाफ, वॉशरमन, मेस कीपर, हाऊस कीपर).
सर्व उमेदवारांना सकाळी 5 ते 8 या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. फक्त मुख्यालय बीईजी व केंद्र, जीएस (क्रीडा) यांच्याकडून प्रायोजित उमेदवारांनाच 4 ऑगस्ट रोजी भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी असेल. उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट देऊन सेवा अटी, आवश्यक कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.