डॉ. जब्बार पटेल यांचा उद्या विद्यापीठात मुक्त संवाद
schedule17 Jul 25 person by visibility 200 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग विभागात उद्या दि. 18 रोजी सकाळी साडेदहा वाजता ख्यातनाम दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी आहेत. मास कम्युनिकेशन विभागात हा कार्यक्रम होईल.
शिवाजी विद्यापीठात गेल्या वर्षापासून बारावीनंतरचा बी. ए. फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात चित्रपट निर्मितीचे धडे दिले जातात.
या विद्यार्थ्यांना तसेच कोल्हापुरातील नाट्य आणि चित्रपट निर्मात्यांना जब्बार पटेल मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. जब्बार पटेल यांच्या मुक्त संवादात चित्रपट आणि नाट्य चळवळीतील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.