SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

जाहिरात

 

बालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल

schedule07 Sep 26 person by visibility 237 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : बालिंगा ते चंबूखडी येथील ७०० मि.मी. व्यासाच्या रायझिंग मेन पाईपलाईनवरील मोठ्या गळतींची दुरुस्ती करण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बुधवार व गुरुवार, दि. ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील संबंधित भागांचा दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

या कामाचा परिणाम ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंट्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड व मंगळवार पेठेतील काही भागांवर होणार आहे.

तसेच संपूर्ण सी व डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवारपेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब तसेच संलग्न ग्रामीण भाग व उपनगरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे.

ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरीतील ५वी, ६वी, ७वी व ८वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक आदी परिसरातही दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes