SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

जाहिरात

 

कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सील

schedule07 Sep 26 person by visibility 259 categoryमहानगरपालिका

◼️महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून 35 लाखांची वसुली; थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभाग व उपद्रव शोध पथकाने शाहू क्लॉथ मार्केटमध्ये धडक कारवाई करत महापालिकेचे भाडे थकीत असलेले तब्बल 60 गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही गाळेधारकांनी जागेवरच थकीत रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या तिजोरीत 35 लाख रुपयांची वसुली झाली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार आज ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या शहरातील विविध गाळ्यांच्या भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. सन 2019 ते 2026 या कालावधीतील थकबाकी भरण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी गाळेधारकांना सवलत योजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही काही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. शाहू क्लॉथ मार्केटमध्ये महापालिकेच्या मालकीचे एकूण 103 गाळे आहेत. या मार्केटमधील एकूण थकबाकी सुमारे 8 कोटी रुपये आहे. कारवाईपूर्वी संबंधित गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत कार्यालयामार्फत नोटिसा व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, थकबाकी न भरल्याने अखेर 60 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेमंड शॉप, राजू लाईट हाऊस, महाराष्ट्र रेक्झीन यांसह विविध व्यवसायांच्या गाळ्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, उर्वरित काही गाळेधारकांनीही आज तातडीने थकीत रकमेपैकी काही रक्कम महापालिकेकडे जमा केली. उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, परवाना अधीक्षक अशोक यादव, कनिष्ठ लिपिक राकेश भोसले, गिरीष नलवडे तसेच इस्टेट, परवाना व घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी व उपद्रव शोध पथकातील जवानांनी ही कारवाई केली.

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या सर्व गाळेधारकांनी आपली थकबाकी तात्काळ भरावी अन्यथा थकबाकीदार गाळ्यांवरही सील बंदची कारवाई करण्यात येईल असा इशारा इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes