ईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धा
schedule08 Sep 26 person by visibility 151 categoryसामाजिक
कोल्हापूर : ईद फेस्टिवल आणि आजरेकर फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.
मुस्लिम बोर्डिंग चे विश्वस्त म .हाजी बाळासाहेब अत्तार, म.हाजी अ.गफूर वंटमुरे आणि म. डॉ. हाजी आदम अत्तार यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मराठी, इंग्रजी व उर्दू अशा तिन्ही माध्यमांतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात.
विद्यार्थ्यांमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र आणि इस्लाम धर्मातील शिकवणीची माहिती व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे. ही परीक्षा ‘ *दीनीयात* '( पुस्तक हिंदी भाषेत आहे)या पुस्तकावर आधारित असून यात १०० बहुपर्यायी (MCQ) प्रश्न लेखी स्वरूपात विचारले जातील.
स्पर्धेची रूपरेषा व गटविभागणी:
पहिली ते पाचवी: गट क्रमांक १
सहावी ते आठवी: गट क्रमांक २
नववी ते बारावी: गट क्रमांक ३
आकर्षक बक्षीसे:
प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख बक्षीसे देऊन गौरवण्यात येईल:
क्रमांक व बक्षीस रक्कम
प्रथम क्रमांक ₹ ३,०००/-
द्वितीय क्रमांक ₹ २,०००/-
तृतीय क्रमांक ₹ १,०००/-
सर्व स्पर्धकांना सहभागीता प्रमाणपत्र देणेत येणार आहे.
सदर क्विझ कॉन्टेस्ट दिवाळीच्या सुट्टीनंतर आयोजित केली जाणार असून, स्पर्धेसाठी नाममात्र ₹ १०/- प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. ' दिनीयात ' हे रु .१०० /- चे पुस्तक नाममात्र रु.२० मध्ये उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेत सर्व धर्मिय विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष , गणी आजरेकर यांनी केले आहे. प्रवेशिका भरणे करिता व
पुस्तके उपलब्ध मुस्लिम बोर्डिंग , दसरा चौक , कोल्हापूर येथे संपर्क करावा.
9595008591