SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेऊ नयेनवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडेकोल्हापूर: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा दणका; कणेरीवाडी व मोरेवाडीत मोठी कारवाईकोल्हापूर: राजारामपुरीतील जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्तमी अनेक वर्षे शेती करतोय परंतु; कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा चांगला ऊस आयुष्यात पाहिला नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन हिंदी पत्रकारिता दिन: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरवशाली वारसापुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारबांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेऊ नये

schedule30 May 26 person by visibility 120 categoryउद्योग

◼️संजयकुमार सुद्रिक, अध्यक्ष, प्राधिकृत अधिकारी मंडळ गोकुळ दूध संघ

कोल्हापूर : गोकुळचेः दूध व दुग्धजन्य पदार्थ भारतीय मानकांनुसार उच्चदर्जाचे व गुणवत्तापूर्ण आहेत. गोकुळच्या उत्पादनाच्या गुणवत्तेचा व दर्जाचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळच्या गुणवत्ता व दर्जा यामध्ये कधीही तडजोड करण्यात आलेली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गोकुळ प्रती असणारी निष्ठा आणि गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थावर ग्राहकांचा असलेला विश्वास यामध्ये कोठेही कमी आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये व गोकुळवरती आपले प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा याला कोठेही तडा जाऊ देणार नाही याची खात्री बाळगावी. 

तसेच कोणीही चुकीच्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ याबाबत गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.

गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसापासून विविध समाजमाध्यमांमध्ये गोकुळच्या दूध व दुग्धजन्य उत्पादनाबाबत अपुऱ्या व चुकीच्या माहितीच्या आधारे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे गोकुळ ब्रँड बाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यास अनुसरून आवाहन करण्यात येते की गोकुळ ही १९६३ पासून शेतकऱ्यांनी, दूध उत्पादक व ग्राहकांसाठी उभी केलेली सहकारी संस्था असून ती ग्राहकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरवीत आहे. गोकुळने FSSAI, ISO 22000, EIC आणि HACCP यांसारखी गुणवत्ता व अन्नसुरक्षा सुनिश्चित करणारे सर्व भारतीय मानके व प्रमाणकांचे काटेकोर पालन करून उत्तम प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देते. त्यामध्ये दूध उत्पादक व ग्राहक यांच्यातील परस्पर विश्वास, आपुलकी व जिव्हाळा हेच गोकुळचे बळ आहे. गोकुळ त्यांच्या कोणत्याही उत्पादनात गुणवत्ता व दर्जाबाबत कधीही तडजोड करत नाही. हलाल प्रमाणपत्र हे केवळ आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी त्या देशांची आवश्यकतेनुसार घेण्यात आलेले होते. त्या प्रमाणपत्राचा आणि गोकुळच्या दूध व दुग्धजन्य उत्पादनाच्या गुणवत्ता व दर्जाचा कोणताही संबंध नाही असे हि त्यांनी स्पष्ट केले.

काही घटक चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे समाज माध्यमावर गोकुळबाबत संभ्रम निर्माण करणारे संदेश प्रसारित करत आहेत. ही बाब खेदजनक असून गोकुळच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे.

 अशा घटकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी चुकीच्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे गोकुळ विषयी संभ्रम निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. वस्तुस्थितीचा योग्य विचार करूनच माहिती प्रसारित करावी. तसेच यापूर्वी प्रसारित करण्यात आलेले चुकीचे व संभ्रम निर्माण करणारे संदेश तात्काळ हटवावेत अन्यथा अशा गैरसमज पसरवणारे संदेश व माहितीमुळे गोकुळच्या ब्रँडला धक्का बसल्यास व बदनामी झाल्यास त्याबाबत कठोर कायदेशीर कारवाई येईल असे सुद्रिक यांनी सांगितले.

यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes