बांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
schedule29 May 26 person by visibility 116 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्मॅक) आणि सुराज्य फौंडेशन, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ज्ञानराज मंगल कार्यालय, टर्निंग पॉईंट, वारणा दुध शित केंद्रासमोर, बांबवडे येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सहायक आयुक्त जमीर करीम यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 21 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी विविध प्रकारचे सुमारे 750 पेक्षा जास्त रिक्तपदे या रोजगार मेळाव्याकरीता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी उत्तीर्ण, 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.