SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय 'सेग्यू ३.०' स्पर्धेत ठरला अव्वल गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटीलकोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाईसंभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणीसाखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेगनवरात्र महोत्सवाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी डॉ राठोडकेर्ले येथील अंगणवाडीतून पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीकिशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!जागतिक टपाल दिन: संवाद आणि संस्कृतीचा विश्वासाचा धागा

जाहिरात

 

गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटील

schedule09 Oct 26 person by visibility 356 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणूक 2026 साठी  कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्व प्रथम राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने केली होती. मात्र या चिन्ह वाटपात महायुतीने हस्तक्षेप करत दबावाचे राजकारण केल्याने समविचारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळू दिले नसल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला. महायुतीने आम्हाला कपबशी हे चिन्ह मिळू दिले नसले तरी दूध उत्पादकांच्या मनात समविचारी आघाडीचाच ठसा आहे. त्यामुळे दूध उत्पादक समविचारी आघाडीच्या पाठीशीच उभे राहतील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. 

गोकुळच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिटृी हे चिन्ह मिळाले आहे. मात्र समविचारी आघाडीने प्रथम मागणी करुनही कपबशी चिन्ह न दिल्याने आमदार पाटील यांनी महायुतीवर निशाना साधला.

 

1) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या दि. 2 मार्च 2026 च्या परिपत्रकानुसार एकाहून अधिक उमेदवारांनी एकाच निशाणीची मागणी केली असल्यास प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य देवून निशाणीचे वाटप करावे असे नमूद करण्यात आले आहे. 

2) नियम 28 (3) (क) मध्ये निवडून द्यावयाच्या एकूण जागाच्या 30 टक्केपेक्षा अधिक उमेदवारांनी गट तयार करुन संबंधित उमेदवारांनी सह्या केलेल्या लेखी सामूहिक अर्जाव्दारे एकाच निशाणीची मागणी केल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अशा गटास सामूहिक निशाणी देण्याची तरतूद आहे. शिवाय अशा गटाला चिन्ह वाटप करताना प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे. 

3) या परिपत्रकानुसार समविचारी आघाडीने छाननी नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर म्हणजेच 30 टक्के पेक्षा अधिक (10 उमेदवार) उमेदवारांचा गट तयार करुन राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने छाननी नंतर पात्र उमेदवारांची पात्र यादी प्रसिध्द झाल्यानंतर म्हणजेच दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.05 मिनीटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कपबशी हे चिन्ह मिळावे  अशी मागणी पत्र देवून केली होती. शिवाय तसा ई-मेल ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला पाठविला होता. आणि चिन्ह मागणीचा पहिला अर्ज आमचा होता.

4) उर्वरीत आघाडीच्या पॅनेलमधील उमेदवारांव्यतिरिक्त पॅनेलमध्ये समाविष्ट होणाऱ्या उर्वरीत 15 उमेदवारांची नांवे नंतर कळवून त्या 15 उमेदवारांनाही कपबशी हे चिन्ह मिळावे अशी विनंती पत्रामध्ये केली होती. 

5) त्यानुसार दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने दुपारी 3.28 मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उर्वरीत 15 उमेदवारांच्या नावांची यादी देत कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती. 

6) उमेदवारी अर्ज माघारीनंतर दि. 09/10/2026 रोजी सकाळी 11.00 वाजे पर्यंत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे व चिन्ह वाटप होणार होते त्याअनुषंगाने आम्ही दि. 09/10/2026 रोजी पहाटे 12.03 मि. आमच्या समविचारी आघाडीच्या 25 उमेदवारांची ‘कपबशी’ चिन्ह मागणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत मेल आयडी वर मेल पाठवून परत त्याच 25 उमेदवारांच्या पत्राची छापील प्रत स. 10.55 मि. सादर केली होती. आणि कायद्यानुसार आमच्या समविचारी आघाडीचाच असा एकमेव अर्ज होता.

7) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या दि. 2 मार्च 2026 च्या परिपत्रकानुसार प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या नियमानुसार राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळणे क्रमप्राप्त होते. 

मात्र चिन्ह वाटपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर महायुतीच्या सत्तेच्या दबावाने कपबशी हे चिन्ह बळकावल्याचा आरोप आमदार पाटील यांनी या पत्रकाव्दारे केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes