SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय 'सेग्यू ३.०' स्पर्धेत ठरला अव्वल गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटीलकोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाईसंभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणीसाखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेगनवरात्र महोत्सवाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी डॉ राठोडकेर्ले येथील अंगणवाडीतून पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीकिशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!जागतिक टपाल दिन: संवाद आणि संस्कृतीचा विश्वासाचा धागा

जाहिरात

 

किशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!

schedule09 Oct 26 person by visibility 311 categoryसामाजिक

कोल्हापूर  : अतिशय प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न पुरस्कार स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष  किशोर घाटगे यांना नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

 गेली 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे  किशोर घाटगे यांना शांतिदूत परिवार, डॉक्टर सुरेश राठोड फाउंडेशन  सर्किट बेंच असोसिएशन, व इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या शांतिदूत इंटरनॅशनल समाज रत्न पुरस्कार कॉन्टिट्यूशनल क्लब नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  रामदासजी आठवले, त्याचबरोबर खासदार रामचंद्र वडकुंजे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, डॉक्टर सुरेश राठोड, सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती होती. 

 केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे  सामाजिक क्षेत्रातील काम अद्वितीय असून शांतिदूत इंटरनॅशनल समाज रत्न हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा असून यापूर्वी या पुरस्काराचे कार्यक्रम थायलंड जपान श्रीलंका या देशात झाले आहेत. देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात देश पातळीवरील व प्रदेशातून आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यामुळे जगात विश्वशांती व आपल्या देशाबद्दल देशभक्तीची भावना निर्माण होईल. 

 यावेळी डॉक्टर सुरेश राठोड शांतिदूत परिवार त्याचबरोबर  इंडियन मित्र पोलीस   भारत संघटना, सर्किट बेंच असोसिएशनचे पदाधिकारी परमाने मॅडम, यशश्री घाटगे. यांचे सह मोठ्या संख्येने विविध सामाजिक क्षेत्रातील देश व परदेशातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes