SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय 'सेग्यू ३.०' स्पर्धेत ठरला अव्वल गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटीलकोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाईसंभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणीसाखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेगनवरात्र महोत्सवाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी डॉ राठोडकेर्ले येथील अंगणवाडीतून पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीकिशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!जागतिक टपाल दिन: संवाद आणि संस्कृतीचा विश्वासाचा धागा

जाहिरात

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेग

schedule09 Oct 26 person by visibility 193 categoryराज्य

◼️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून विविध शस्त्रक्रिया व मोफत उपचार

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेग देण्यात आला असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) माध्यमातून अंगणवाडीतील बालके आणि शालेय विद्यार्थ्यांना विविध आरोग्य सेवा, आवश्यक शस्त्रक्रिया व विशेष उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत.

जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये अंगणवाडी आणि शाळांमधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. बालकांमधील आरोग्यविषयक समस्या लवकर ओळखून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, बालपणातील आजार तसेच विकासात्मक विलंब व अपंगत्व या चार प्रकारांवर आधारित तपासणी केली जाते.

तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या बालकांना आवश्यकतेनुसार हृदयरोग तपासणी व हृदयशस्त्रक्रिया, नेत्ररोग आणि दंत तपासणी, विविध आवश्यक शस्त्रक्रिया, विशेष उपचार, पुढील तपासण्या, तज्ज्ञांचा सल्ला आणि संदर्भ सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. किशोरवयीन मुला-मुलींनाही आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. बालकांच्या आरोग्य समस्यांचे वेळेत निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

बालकांचे निरोगी बालपण ही निरोगी महाराष्ट्राची पायाभरणी आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes