SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

पर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

schedule17 Mar 26 person by visibility 378 categoryसामाजिक

🔸कोल्हापुरातील अन्नछत्रांना अखंडित गॅस पुरवठा करण्याची मागणी
कोल्हापूर : करवीरनगरीतील भाविक, पर्यटक आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्रांना व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि अन्नछत्रांचा गॅस पुरवठा 'अत्यावश्यक सेवा' म्हणून अखंडित ठेवावा, अशी मागणी सकल हिंदू समाज, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे अंबाबाई दर्शन, जोतिबा डोंगर आणि पन्हाळा यांसारख्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर दररोज लाखो पर्यटक भेटी देतात. या पर्यटकांसह, सीपीआर रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि गरजू लोकांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, श्री अंबाबाई भक्त मंडळ मोफत अन्नछत्र, कोल्हापुरी थाळी आणि उत्तरेश्वर थाळी यांसारख्या संस्था नाममात्र दरात किंवा मोफत भोजन सेवा पुरवतात.

 कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे हॉटेलिंग व्यवसायासोबतच अन्नछत्रांच्या सेवेत अडथळे येत आहेत. शासनाने आश्रमशाळा आणि रुग्णालयांना जसा अखंडित गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत, त्याच धर्तीवर कोल्हापूरसाठी 'खास बाब' म्हणून ही परवानगी मिळावी.
 उन्हाळी सुट्टीत वाढणारी गर्दी लक्षात घेता हा पुरवठा तातडीने सुरळीत करावा.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहिनी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर, शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या निवेदनावर समन्वयक  किशोर घाटगे, निरंजन शिंदे, योगेश मांजरेकर, दौलत घाटगे, मनोहर सोरप, राजेंद्र चोरगे, विशाल शिराळकर, संजय साळोखे (अध्यक्ष अंबाबाई भक्त मंडळ), ॲड. तन्मय मेवेकर, फिरोजखान उस्ताद, योगेश केरकर, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, रश्मी साळोखे आणि इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes