SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक : मंत्री आशिष शेलार

schedule21 Feb 26 person by visibility 167 categoryराज्य

▪️ शानदार कार्यक्रमामध्ये लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर :  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व मंत्री यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण आज करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.   
                                  
      व्यासपीठावर कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे , निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, पुरातत्व पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे , सहसंचालक डॉ . विलास वाहणे,इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत,अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक प्रा.डॉ रमेश जाधव आदी उपस्थित होते.

  ते म्हणाले,छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे राज्य सरकारने या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे.कोल्हापूर शहर हे राष्ट्रीय इतिहास पर्यटनाचे केंद्र बनावे अशी अपेक्षा व्यक्त करीत या स्मारकाच्या रिकाम्या जागेत तिसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

         विदेशात असलेली जगदंबा तलवार लीजवर भारतात आणावी अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.यावर उत्तर देताना ती तलवार आणण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही  शेलार यांनी यावेळी सांगितले.

    याप्रसंगी ' भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश ' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस जतन व नियमायक समिती अंतर्गत असणाऱ्या वस्तूसंग्रहालय उपसमितीतील सदस्यांचा श्री शेलार यांच्या हस्ते ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी राजर्षी शाहू सलोखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ' शाहू समता ज्योत ' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

   यावेळी महेश जाधव, डॉ .मंजुश्री पवार,
वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे , शाहू स्मारकचे व्यवस्थापक दत्तात्रय नागर ,पॅलेसचे समन्वयक उत्तम कांबळे यांच्यासह अनेक शाहू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes