SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

schedule23 Feb 26 person by visibility 113 categoryराज्य

कोल्हापूर : उद्योजकांना सर्व योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह आवार, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, नवउद्योजक व निर्यातदार यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे याकरिता उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत.

या एक दिवसीय कार्यशाळेत राज्य आणि केंद्र शासन तसेच इतर विभागातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये:
• सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी असलेल्या योजना.
• निर्यात संदर्भातील अडचणी.
• केंद्र शासनाची 'शून्य परिणाम, शून्य दोष' (ZED) योजना.
• सिडबी (भारतीय लघु उद्योग विकास बँक) व आयडीबीआय कडील उद्योजकांसाठी असलेल्या कर्ज सुविधा.
• सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात डिजिटल व्यापाराचे (Digital Commerce) महत्त्व.
• केंद्र शासनाच्या परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) कार्यालयाचा उद्योजकांना होणारा फायदा.
• उद्योगासाठी मैत्री कायदा.
• मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी (Logistics) असलेल्या भारतीय डाक विभागाच्या सेवा.
• केंद्र शासनाच्या अभियांत्रिकी निर्यात प्रवर्धन परिषद (EEPC) योजना.
• राज्य शासनाच्या कृषी विभागाचा उद्योजकांना होणारा फायदा इत्यादी बाबींचा समावेश आहे.

कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादी घटकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes