SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

ए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात

schedule23 Feb 26 person by visibility 81 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कसबा बावडा येथे ए.एन.एम. प्रथम वर्ष विद्यार्थीनींचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. वाडीकर यांनी परिचर्या सेवेचे समाजातील महत्त्व, रुग्णसेवेतील संवेदनशीलता व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. आरोग्य सेवेतील परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यार्थीनींनी सेवाभाव जपत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर, सेवा रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका श्रीम. एस.एस. रासने, तसेच छ.प्र.रा.स. रुग्णालयाच्या प्रभारी सहायक अधिसेविका श्रीम. एस.एस. भिवसे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सुरवसे, पाठ्यनिर्देशिका यांनी तर श्रीम. ए.बी. हराळे, पाठ्यनिर्देशिका (एन.एच.एम.) यांनी आभार प्रदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes