SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावा

schedule23 Feb 26 person by visibility 110 categoryराज्य

कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात १५ मार्च रोजी सकाळी १०.०० वा. पासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

 या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना विशेष सूचना दिल्या. शिबिराच्या ठिकाणी ४० हून अधिक स्टॉल्स महानगरपालिका, आरोग्य, कृषी, जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रेशीम उद्योग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहकार, महसूल, समाज कल्याण, एकात्मिक बाल विकास आणि कामगार कल्याण अशा विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत कार्ड, जातीचे व उत्पन्नाचे दाखले आणि नवीन रेशन कार्ड यांसारख्या सेवा प्रत्यक्ष जागेवरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना लाभार्थ्यांची यादी आगाऊ तयार ठेवण्याचे आणि त्यांना शिबिराची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

केवळ शासकीय योजनाच नव्हे, तर कायदेशीर साक्षरतेवरही या शिबिरात भर दिला जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आणि तज्ज्ञ यादिवशी नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देणार असून, प्रलंबित खटल्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर केवळ एक कार्यक्रम न राहता गरजू लोकांसाठी प्रत्यक्ष मदतीचा हात ठरावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि विविध विभागांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes