SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

schedule23 Feb 26 person by visibility 60 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. विविध नवे हवाई मार्ग सुरू होत आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या पर्यटन,  उद्योग क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमान सेवा सुरू होत आहे. 29 मार्च पासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ, या दरम्यान इंडिगो कडून नवी सेवा सुरू होत असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. 

रोज सकाळी आठ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेईल,  आणि सव्वानऊ वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजून 35 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, नवी मुंबई विमानतळावर, १० वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी ७.२० वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, साडेआठ वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर ८ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारे विमान, ९ . ५०  वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस, इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होत असल्याने, कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून, पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येणे सहज शक्य होणार आहे. कोल्हापूरकरांची एक प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूर मुंबई मार्गावर दैनंदिन आणि सोयीस्कर वेळेतील विमानसेवा सुरू होत आहे.

 सुरुवातीला या मार्गावरील तिकीट दर ७,६०० रुपये असणार आहे. पर्यटन, उद्योग- व्यवसाय या दृष्टीने ही नवी विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes