सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
schedule27 Apr 26 person by visibility 157 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): प्रणव पाटील (९७), सिद्धार्थ परमाज (९४), अधिराज जाधव व स्नेहा माकीजा (९३), योगीराज पाटील (९२). शाळेतील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पास झाले आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, उपमुख्याध्यापिका तरन्नूम मुल्ला यांचे मार्गदर्शन तर प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.