SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरवजागतिक आरेखन दिन: सर्जनशीलतेचा उत्सवकोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटकआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणीजागतिक बौद्धिक संपदा दिननदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटक

schedule26 Apr 26 person by visibility 278 categoryगुन्हे

कोल्हापूर  : अनफ बुद्रुक (ता. भुदरगड) येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०,५२० रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.

२३ ते २४ एप्रिलच्या दरम्यान फर्जाना फयाज शेख यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कागल-मुरगुड रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ सापळा लावला.

यावेळी पोलिसांनी बाबू राजू शेख (वय २७, रा. निपाणी, जि. बेळगाव) याला संशयास्पदरित्या ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याच्या बाली, चांदीच्या बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४०,५२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला भुदरगड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes