SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडमहाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटीलईस्टर संडे: पुनरुत्थानाचा सण आणि मानवतेचा नवा प्रवासईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाजयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला : आमदार सतेज पाटील; कुटुंबियांची सांत्वनपर भेट

जाहिरात

 

भोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशय

schedule05 Apr 26 person by visibility 119 categoryराज्य

मुंबई  : नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबांच्या कारवायांविरुद्ध राज्य सरकार आक्रमक असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः अशोक खरात याच्या विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती १५०० ते २००० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

 या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 'SIT' (विशेष तपास पथक) नियुक्त करण्यात आले असून, यात आता 'ED' कडूनही चौकशी केली जात आहे. ज्यांच्याकडे ठोस पुरावे आढळतील, त्यांच्यावर कोणतीही गय न करता कडक कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यासोबतच, अंजली दमानिया यांचा 'CDR' (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक झाल्याच्या प्रकरणाची राज्य सरकारमार्फत कसून चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीचा CDR मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांनाच असतो, त्यामुळे तो लीक होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भोंदूगिरी आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सरकार कोणाच्याही दबावाखाली न येता कडक पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes