SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्तबारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघारक्रीडाशक्तीतून शांतता आणि प्रगतीकडे: 'आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस'बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडमहाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला : आमदार सतेज पाटील; कुटुंबियांची सांत्वनपर भेट

schedule04 Apr 26 person by visibility 282 categoryसामाजिक

कोल्हापूर : जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने मराठा इतिहासाचा एक चालता-बोलता संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांनी शनिवारी डॉ.स्व.पवार यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी वसुधा पवार (काकी ) आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला.

 आमदार पाटील म्हणाले, पवार कुटुंबाशी आमचे नाते हे स्नेह, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या धाग्यांनी विणलेले आहे. या कठीण प्रसंगी मनात असंख्य भावना दाटून आल्या. जयसिंगराव पवार यांचे  मार्गदर्शन प्रत्येक पावलावर प्रेरणा देत राहील.

यावेळी त्यांची कन्या डॉ. मंजुश्री पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास कदम, अरूंधती पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes