ईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
schedule04 Apr 26 person by visibility 118 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईस्टर हा सण प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज शेकडो वर्षांनी देखील येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.