SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह

schedule17 Mar 26 person by visibility 264 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या  डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ  इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये घाटगे  पाटील इंडस्ट्रीज  लिमिटेड आणि बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड या अग्रगण्य औद्योगिक कंपन्यांचा  कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.  या ड्राईव्हमुळे उद्योग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली.

इन्स्टिट्यूटच्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून या ड्राइव्हचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे, त्यांना रोजगारक्षम बनवणे आणि उद्योग–शिक्षण दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने इन्स्टिट्यूट सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
हा प्लेसमेंट ड्राईव्ह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या शाखांतील डिग्री व डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. ड्राईव्हपूर्वी कंपनी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांसाठी प्री-प्लेसमेंट सत्र घेऊन कंपनीची कार्यसंस्कृती, उद्योगातील अपेक्षित कौशल्ये, करिअर संधी तसेच निवड प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्लेसमेंट प्रक्रियेत उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञान व कौशल्यांची तपासणी मुलाखतीद्वारे करण्यात आली. घाटगे  इंडस्ट्रीजमध्ये  मशीन शॉप मधील विविध पदांसाठी भरती झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजसह तसेच प्रोव्हिडंड फंड ,  वैद्यकीय सुविधा, बोनस, बस सुविधा व कॅन्टीन सुविधा असे विविध  लाभ मिळणार आहेत. बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये  क्वालिटी एक्झिक्यूटिव्ह  आणि  प्रोडक्शन सुपरवायझर  पदांसाठी भरती  झाली असून  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. 
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी, मुलाखत व्यवस्थापन आणि उद्योग प्रतिनिधींशी समन्वय या सर्व बाबी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलने अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्या.

 बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडकडून एचआर मॅनेजर दीपक कुंभार यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. तसेच घाटगे  पाटील इंडस्ट्रीज  लिमिटेडकडून सचिन भोसले  (डीजीएम -एचआर), परशुराम चौगुले (सहाय्यक महाव्यवस्थापक) आणि रोहन चौगले (अधिकारी -एचआर) यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी ड्राईव्हसाठी आवश्यक  सर्व  सुविधांचे  उत्तम व्यवस्थापन केले . 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांचे आयोजन इन्स्टिट्यूटकडून सातत्याने करण्यात येत असून, यामुळे संस्थेची उद्योगाभिमुख शिक्षण देणारी ओळख अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे  , संस्थेच्या सचिवा प्राचार्या  शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे ड्राईव्हच्या  यशस्वी संचालनासाठी मार्गदर्शन लाभले . ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी  प्रा. पी . टी . पानसरे यांनी समन्वयन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes