SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी २० जूनपासून 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीमअनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडसांगलीतील महिला बुद्धिबळ स्पर्धेत 'केन चेस अकॅडमी'च्या खेळाडूंचे यशडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हशासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजनज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी डॉ. रासकर यांची निवडकोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठावडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्रसंथ चाल, सुरक्षित भविष्य: जागतिक कासव दिन!

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह

schedule23 May 26 person by visibility 254 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या  डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ  इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये एलकॉम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या अग्रगण्य कंपनीचा  कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात  यशस्वीपणे पार पडला.  या ड्राईव्हमुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील डिप्लोमा आणि पदवीधारकांना  करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली. इन्स्टिट्यूटच्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून या ड्राइव्हचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले.

 विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे, त्यांना रोजगारक्षम बनवणे आणि उद्योग–शिक्षण दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने इन्स्टिट्यूट सातत्याने प्रयत्नशील असते. एलकॉम कंपनी इलेक्ट्रोमेकॅनिकल कंपोनंट्स आणि स्मार्ट डीपीयुची निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी आहे. सेल्स मार्केटिंग , डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी पदासाठी तसेच इंटर्नशिपसाठी आयोजित या ड्राईव्हमध्ये कंपनी प्रतिनिधींनी प्री-प्लेसमेंट सत्र घेऊन कंपनीची कार्यसंस्कृती, उद्योगातील अपेक्षित कौशल्ये, करिअर संधी तसेच निवड प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्लेसमेंट प्रक्रियेत उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञान व कौशल्यांची तपासणी मुलाखतीद्वारे करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. 
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी, मुलाखत व्यवस्थापन आणि उद्योग प्रतिनिधींशी समन्वय या सर्व बाबी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलने अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्या. कंपनीतर्फे  सतीश कांबळे ( सहाय्यक जनरल मॅनेजर - एच आर), ओमकार आवटी (सहाय्यक जनरल मॅनेजर - सेल्स अँड मार्केटिंग), सुजाता वैद्य, अविनाश कोळी, अश्विनी दळवी आणि प्रथमेश सराफ यांनी काम पाहिले. 

संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी ड्राईव्हसाठी आवश्यक  सर्व  सुविधांचे  उत्तम व्यवस्थापन केले . 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांचे आयोजन इन्स्टिट्यूटकडून सातत्याने करण्यात येत असून, यामुळे संस्थेची उद्योगाभिमुख शिक्षण देणारी ओळख अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे ड्राईव्हच्या  यशस्वी संचालनासाठी मार्गदर्शन लाभले . ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी  प्रा. पी . टी . पानसरे यांनी समन्वयन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes