शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन
schedule23 May 26 person by visibility 200 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शासकीय तंत्रनिकेन ,कोल्हापूर येथे थ्री डी प्रिंटिंग,ॲडीटिव मॅन्युफॅक्चरिंग अँड सॉलिड वर्क्स या विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील पॉलिटेक्निमधील 30 प्राध्यापक सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना डॉ .नरके यांनी शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अपडेट ठेवावे, असे नमूद केले.
डॉ.नितीन सोनजे यांनी सांगितले की , शासकीय तंत्रनिकेतन मधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांना नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. एक्सलन्स सेंटरचे समन्वयक डॉ.रणजीत सावंत यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गर्गे, डॉ.दिग्विजय रावळ, प्रा.शशांक मांडरे, डॉ. महांतेष चौधरी, श्री.सचिन पतंगे उपस्थित होते.