कोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठाव
schedule23 May 26 person by visibility 119 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आज सकाळी ७ वाजल्यापासून स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात आले. ही स्वच्छता मोहीम महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत १५ टन खरमाती, प्लास्टिक, तणकट व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
ही स्वच्छता मोहीम माऊली पुतळा ते जवाहरनगर रोड, माऊली पुतळा ते सायबर चौक आणि एनसीसी भवन या परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्य रस्ते, फूटपाथ, डिव्हायडरची स्वच्छता करून, प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. या कामासाठी २ आयवा डंपर, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीचा वापर करण्यात आला.
या मोहिमेत नगरसेवक अभिजीत मोकाशी, उमेश पोवार, नगरसेविका पूजा पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, इस्माइल बागवान, सतीश पोवार, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, महापालिका आरोग्य विभागाचे ३० कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.