SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी २० जूनपासून 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीमअनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडसांगलीतील महिला बुद्धिबळ स्पर्धेत 'केन चेस अकॅडमी'च्या खेळाडूंचे यशडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हशासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजनज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी डॉ. रासकर यांची निवडकोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठावडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्रसंथ चाल, सुरक्षित भविष्य: जागतिक कासव दिन!

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके

schedule23 May 26 person by visibility 148 categoryराज्य

▪️आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज

 

कोल्हापूर  : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या समोर सकाळी 8 वाजलेपासून मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले. 

 

यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिकेना आपत्ती व्यवस्थान यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. मागील वर्षी योग्य नियोजन केल्यामुळे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नव्हती त्याच अनुषंगाने याही वर्षी महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थानाबाबत योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात यावी. सध्या पावसाळयापुर्वी शहरातील नाल्यांची सफाईचे काम सुरु आहे. तसेच रेस्क्यूचे आज प्रात्यक्षिक आज करण्यात आले. सध्या महापालिकेकडे 3 लहान बोट, 14 रेस्क्यू बोट, या सर्वांचे प्रात्यक्षिक आज दाखविण्यता आले.

 

 कोल्हापूरमध्ये सन 2019 व 2021 ला जी पूरजन्य परिस्थीती झाली होती त्याचा अनुभव सर्वच कोल्हापूर वासियांना आहे. याच्यापासून आपणकशा पध्दतीने आपण अनुभव घेऊ शकतो याचेच एक प्रात्यक्षिक आज झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर महानगरपालिकेडे अत्याधुनिक साहित्य आपल्याकडे आहे. नागरीकांनी महापालिकेने वेळेवेळी दिलेल्या सूचनांचे पाल करावे तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये महापालिकेने केलेल्या आवाहनाचे पालन करावे असे आवाहन आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिका दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातुन लाईफ जॉकेट, फायबर इनर व नव्याने दाखल झालेले रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या सहाययाने बुडणाऱ्या व्यक्तिला सुखरुप कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ऑल इंडिया इन्सीट्युट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट फायर कॉलेज विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 

यावेळी अति-आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, तांडेल  किसन पवार, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीष गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, रोहन लगडे, तसेच बावडा रेस्क्यु फोर्सचे स्वयंसेवक व अग्निशमन विभागाकडील जवान उपस्थीत होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes