SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहनजयसिंगपूर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर : आमदार यड्रावकरआंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस ४९ कोटींची प्रशासकीय मंजुरी : आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यशमिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्पकेडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीचसंसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणारा RAF जवान निष्पन्न; CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती उघड!दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त! साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपरा

जाहिरात

 

मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

schedule27 Jul 26 person by visibility 183 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील अनेक मिळकतींवर बिल्डरकडून खरेदी करूनही अथवा वारसा हक्काने मिळकत प्राप्त होऊनही मालकाचे नाव महापालिकेच्या अभिलेखात हस्तांतरित झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत चारही विभागीय कार्यालयामार्फत मिळकत नाव हस्तांतरणासाठी विशेष एकदिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

हा कॅम्प दि. 30 जुलै २०२६ रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट, विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी व विभागीय कार्यालय क्रमांक ४ छत्रपती ताराराणी मार्केट या कार्यालयात घेण्यात येणार आहे. नाव हस्तांतरण बाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या मिळकतीवर नाव हस्तांतरित करून घ्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

यासाठी आवश्यक कागदपत्रे  मालकीसंबंधित ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड (तीन महिन्यांच्या आतील) – मूळ प्रत, इंडेक्स-२ची छायाप्रत, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा घरफाळा भरल्याच्या पावतीची छायाप्र, हस्तांतरण शुल्क – खरेदी रकमेच्या ०.१ टक्के सादर करावीत.

महापालिकेने नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घेऊन मिळकतीवरील नाव हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes