SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहनजयसिंगपूर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर : आमदार यड्रावकरआंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस ४९ कोटींची प्रशासकीय मंजुरी : आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यशमिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्पकेडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीचसंसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणारा RAF जवान निष्पन्न; CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती उघड!दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त! साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपरा

जाहिरात

 

संसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणारा RAF जवान निष्पन्न; CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती उघड!

schedule27 Jul 26 person by visibility 159 categoryदेश

नवी दिल्ली :२० जुलै रोजी संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध विद्यार्थी संघटनांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेत पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. याच आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता; मात्र दिल्ली पोलिसांनी तो फेटाळला होता. आता याप्रकरणी CRPF च्या उच्चस्तरीय चौकशीत मोठा खुलासा समोर आला आहे.

 ◼️ जवानाची ओळख पटली: संसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणाऱ्या रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) जवानाची अखेर ओळख पटली आहे.

 ◼️CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर: चौकशीदरम्यान संबंधित जवानाने तब्बल ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

 ◼️ रुग्णालयाकडून दुखापतीची पुष्टी: या घटनेत किमान चार जण पॅलेटच्या छर्र्यामुळे जखमी झाल्याचे समोर आले होते. विशेषतः 'सफदरजंग' रुग्णालयाने एका जखमीच्या शरीरावर पॅलेटमुळे झालेल्या जखमांची अधिकृत पुष्टी केली होती. या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत आणि सार्वजनिक व्यासपीठांवर मोठा गदारोळ घातला होता.

◼️निषेध आणि कठोर कारवाई:

 घटनेच्या तीव्र पडसाद उमटल्यानंतर RAFच्या महानिरीक्षक सीमा धुंडिया यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्लीत पुढील आदेशापर्यंत प्रोजेक्टाइल एक्शन गन (PAG), अँटी राईट गन (ARG), इलेक्ट्रिक शॉक वेपन आणि इलेक्ट्रिक शील्ड यांच्या वापरावर व वितरणावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तसेच, जंतर-मंतर आणि संसद मार्चदरम्यान झालेला बलप्रयोग हा ठरवून दिलेल्या नियमांच्या आणि पद्धतींच्या विरुद्ध असल्याचे स्पष्ट करत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
>

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes