SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

संयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात

schedule31 Mar 26 person by visibility 242 categoryसामाजिक

कोल्हापूर  : तारदाळ गावांमधील संयुक्त संगमनगर मध्ये श्रीराम नवमी उत्सव श्रीराम चौक येथे साजरा करण्यात आला. प्रथम कान्होपात्रा भजनी मंडळ यांचे वतीने भक्ती भाव गीते सादर करण्यात आली. त्यानंतर कराओके सिस्टीम द्वारे भक्ती भावगीते  मुकुंद चौगुले व  प्रमोद सिंहासने,  सुनील मांगलेकर , राजू नदाफ या सर्वांची प्रभू रामचंद्रांच्या वरील गाणी सादर करण्यात आली.

.त्यानंतर सत्कार समारंभ आमदार  राहुल आवाडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे , जिल्हा  परिषद ग्राम पंचायत सदस्य प्रियांका खोबरे यांच्या सत्कार करण्यात आला.

 तसेच  ह. भ. प .प्रथमेश इंदुलकर यांचे श्री प्रभू रामचंद्र यांचे व छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज व सद्यपरिस्थितीतील मुलांच्यावर सुंदर असे व्याख्यान सादर केले संपूर्ण कार्यक्रम पार पडण्याकरिता भागातील सुनील मांगलेकर , दत्तात्रय सोनवणे, संजय महाडिक , अमर कोळी रोहित पोळ ,राजू गट्टे ,सुमित साटम , संजय पाटील, आनंद ग्वाडी व इतर सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. तारदाळ ग्रामपंचायत सदस्य आणि संगमनगर भागातील सर्वजण श्रीराम नवमी कार्यक्रमास उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes