SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरू

schedule01 Apr 26 person by visibility 273 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2026 रविवार, 21 जून  रोजी घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता (TET) परीक्षा घेण्यात येत असून, इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर-1) तसेच 6 वी ते 8 वी (पेपर-२) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

 परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची 27 मार्च पासून सुरू झाली असून 16 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी- 27 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे- 9 ते 21 जून पर्यंत, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 दिनांक व वेळ- रविवार, 21 जून सकाळी 10.30 ते 1 पर्यंत तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -2 दिनांक व वेळ- रविवार, 21 जून दुपारी 2.30 ते 5 पर्यंत असणार आहे.
काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

 परीक्षाक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती जिल्हा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यशावकाश प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes