SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

करवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

schedule01 Apr 26 person by visibility 275 categoryराज्य

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना असणारे ऐतिहासिक महत्व आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून, राज्य शासनाने ३ मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील दोनवडे येथील श्री जोतिर्लींग देवालय, बहिरेश्‍वर मधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळे मधील विठ्ठलाई देवी मंदिराचा समावेश आहे. 

या तीनही मंदिरांना अनेक वर्षांची परंपरा असून, वार्षिक यात्रेसह भाविकांची या मंदिरांमध्ये नियमित गर्दी असते. त्यामुळे या मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्रात समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. त्याला यश येवून, या तीनही देवालयांना ब वर्ग दर्जा मिळाला आहे.

 याबाबतचा आदेश २४ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला आहे. खासदार महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येवून, तीनही मंदिरांना ब वर्ग दर्जा मिळाल्याने, या मंदिरांचा विकास आणि विस्तार होवून, विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मंदिर विकासासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मंदिर कमिटी, विश्‍वस्त आणि ग्रामस्थांकडून खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes