SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसान

schedule02 Apr 26 person by visibility 131 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील एका सुपर बाजारला आज पहाटे भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास दुकानातून धुराचे लोट येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली आणि सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 पोलीस आणि संबंधित विभाग या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes