SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....

schedule02 Apr 26 person by visibility 137 categoryराज्य

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.

अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती  करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी  ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes