SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
फटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरणकोल्हापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चा

schedule06 Nov 26 person by visibility 185 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :  महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वाची सभा सभापती विशाल  शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, यामध्ये शहरातील विविध विकासकामांच्या मंजुरीसह यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या उपलब्धतेवर सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. बैठकीत चांदणेनगर येथील जुने सार्वजनिक शौचालय पाडण्याच्या प्रस्तावासह विविध विभागांसाठी बाह्ययंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याच्या आणि नाले सफाईसाठी घेतलेल्या यंत्रसामग्रीच्या मुदतवाढीच्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ते मंजुरीसाठी आले. बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रभागांमधील कचरा उठाव, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि उद्यान विभागाच्या कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वर्ष संपत आले तरी बजेटचा निधी खर्च न झाल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांशी चर्चा करून निधी उपलब्धतेनुसार योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वर्कशॉप विभागाकडून पुरेशी यंत्रणा मिळत नसल्याने नगरसेवकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली आणि जेसीबीची वानवा असल्यामुळे खरमाती व कचरा उठाव रखडला असून, अनेक भागांत खासगी यंत्रणा लावावी लागत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. यावर वर्कशॉप विभागाने ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ठेकेदार निश्चित केला असून आयुक्तांच्या मंजुरीने यंत्रणा वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर महापालिकेला सीएसआरमधून लवकरच आणखी दोन बूम मिळणार असल्याने प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र बूम उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. 

याशिवाय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहान व्यावसायिकांना पुढील १५ दिवस विनाअडथळा व्यवसाय करू देण्याची आणि त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक वा हकालपट्टीची कारवाई न करण्याची आक्रमक भूमिका सभापतींनी घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes