SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरणकोल्हापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागूशेतकऱ्यांचा दणका! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ऊसाला मिळणार प्रतिटन ४२०० रुपये; किणी टोलनाक्यावरील 'चक्का जाम' आंदोलन मागे

जाहिरात

 

यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूत

schedule06 Nov 26 person by visibility 237 categoryउद्योग

◼️आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते नूतन वास्तूत बँकिंग कामकाजाचा शुभारंभ

जयसिंगपूर :  सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी दूरदृष्टीतून स्थापन केलेली आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या जयसिंगपूर येथील जयसिंगपूर शाखा व प्रशासकीय कार्यालय स्टेशन रोडवरील स्वमालकीच्या भव्य व सुसज्ज वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आले. शुक्रवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते नूतन वास्तूमध्ये बँकेच्या नियमित कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. सहकार, विश्वास आणि ग्राहकसेवा या त्रिसूत्रीवर आधारित वाटचाल करणाऱ्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीतील हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा आहे.

 संस्थापक सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर यांनी सहकार क्षेत्रात रुजविलेल्या मूल्यांचा वारसा जपत बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. याच वाटचालीला अधिक बळकटी देणारी ही नूतन वास्तू ठरणार आहे.यापूर्वी जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर ९ येथील राम मंदिर देवालय ट्रस्टच्या इमारतीमध्ये बँकेची मुख्य शाखा कार्यरत होती. ग्राहकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि सोयीस्कर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बँकेने स्टेशन रोडवरील गल्ली नंबर ६ जवळ, वायचळ बुक सेलर्सच्या समोर स्वतःची भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे. या वास्तूमध्ये शुक्रवारपासून बँकेच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. यावेळी बँकेच्या एटीएम सेवेचे उद्घाटन देखील झाले.

स्वतःच्या मालकीची वास्तू उभारणे हे कोणत्याही सहकारी बँकेच्या आर्थिक स्थैर्याचे, संस्थात्मक प्रगतीचे आणि भविष्यकालीन विस्ताराचे प्रतीक असते. यड्राव बँकेने साध्य केलेली ही उपलब्धी सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि बँकेशी जोडलेल्या सर्व घटकांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. नूतन वास्तूच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देत बँकेच्या प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या शुभारंभप्रसंगी बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर, व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम, बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ चेअरमन श्री संजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका आवाडे यड्रावकर, बँकेचे संचालक मंडळ, चार्टर्ड अकाउंटंट विद्यासागर बस्तवाडे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.बँकेचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यड्राव बँकेच्या सहकारातील विश्वासार्ह वाटचालीला नूतन वास्तूच्या माध्यमातून नवी झळाळी मिळाली असून, ग्राहकाभिमुख बँकिंग सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes