SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरणकोल्हापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागूशेतकऱ्यांचा दणका! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ऊसाला मिळणार प्रतिटन ४२०० रुपये; किणी टोलनाक्यावरील 'चक्का जाम' आंदोलन मागे

जाहिरात

 

मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली

schedule06 Nov 26 person by visibility 136 categoryराज्य

🔲 ऊसदराची कोंडी फोडल्याबद्दल ऊसमोळी भेट देऊन व्यक्त केली कृतज्ञता
​🔲 शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाल्याच्या भावना
​           
कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. समन्वयाने संवाद साधत ऊसदराची कोंडी फोडली. त्याबद्दल मंत्री  मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी कृतज्ञतापर सत्कार केला. उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री  मुश्रीफ यांना ऊस मोळी भेट देऊन आपल्या कृतज्ञतापर भावना व्यक्त केल्या. आणि दिवाळी  तोंडावरच ही कोंडी फुटल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 
​               
मंत्री  मुश्रीफ कागल येथील शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असल्याचे समजताच सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला परिसरातील व तालुक्यातील शेतकरी जमू लागले.                     
कागल येथील शेतकरी हरी बोते  म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ यांनी ऊसदराची आठवडाभर सुरू असलेली कोंडी फोडली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या हातून सदैव शेतकऱ्यांची सेवा घडत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. 
​            
सिद्धनेर्ली येथील शेतकरी सुभाष मगदूम म्हणाले, गेले तीन-चार दिवस आम्ही रस्त्यावरच आंदोलनात होतो. शेतकऱ्यांची तळमळ असलेले लोकप्रतिनिधी म्हणून नामदार हसन मुश्रीफ यांनी कोंडी फोडावी अशी आमची अपेक्षा होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी ती कोंडी फोडली आणि आमची दिवाळी गोड झाली आहे. 
​                
कागल येथील शेतकरी म्हाळू बिरू पाचगावे  म्हणाले, ऐन दिवाळीच्या तोंडावरच निर्माण झालेली ऊसदराची कोंडी फोडून आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी नामदार हसन मुश्रीफ यांनी गोड केली आहे. आमच्या सर्व शेतकऱ्यांची पुण्याई आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.  
          
◼️कंडका पाडला, आनंद झाला.....!
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री  मुश्रीफ यांचे अभिनंदन केले व आभारही मानले. बहुतांशी शेतकऱ्यांनी "साहेब, ऊस दराचा तुम्ही तर कंडकाच पाडला आणि ऐन दिवाळीतच आनंदी आनंद झाला,"  अशा भावना व्यक्त केल्या.......!

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes