SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरणकोल्हापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागूशेतकऱ्यांचा दणका! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ऊसाला मिळणार प्रतिटन ४२०० रुपये; किणी टोलनाक्यावरील 'चक्का जाम' आंदोलन मागे

जाहिरात

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीम

schedule06 Nov 26 person by visibility 124 categoryराज्य

◼️२० नोव्हेंबरपर्यंत तपासणी; जादा भाडे आकारल्यास कारवाई

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजीमार्फत खासगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांढेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या मोहिमेदरम्यान विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे, परावर्तिका, इंडिकेटर, टेललाईट व वायपरची स्थिती आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. तसेच वाहनांमध्ये केलेले बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खातरजमा, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन दरवाजा व इतर दरवाजांची कार्यक्षमता अशा एकूण ११ प्रमुख बाबींची तपासणी केली जाणार आहे.

कंत्राटी प्रवासी बसधारकांनी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारू नये. जादा भाडे आकारणी केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास किंवा जादा भाडे आकारल्यास प्रवाशांनी आरटीओच्या 02302990051 या व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा mh51.forhptr@gmail.com  या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes