कोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील सात विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस मुलाखती द्वारे निवड
schedule29 Sep 26 person by visibility 365 categoryशैक्षणिक
वारणानगर : वारणा विद्यापीठाच्या अग्रणी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील सात विद्यार्थ्यांची मॉडर्न कन्स्ट्रक्शन (किन्शासा, काँगो, दक्षिण आफ्रिका) या आंतरराष्ट्रीय कंपनीत ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर पदासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष पाटील, रविराज देसाई, तेजस पाटील, सुरज शिंदे, साहिल पाटील, रोहित बिरंजे आणि ओंकार जाधव यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस मुलाखतीद्वारे वारणानगर मध्ये करण्यात आली.
मॉडर्न कन्स्ट्रक्शन ही दक्षिण आफ्रिका व काँगो येथे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी असून हॉस्पिटल तसेच औद्योगिक प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये कंपनीचे योगदान आहे. कंपनीत १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र, तांत्रिक अभियोग्यता चाचणी तसेच प्रात्यक्षिक मुलाखती घेण्यात आल्या. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यास मदत झाली.
या निवड प्रक्रियेत इथरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक अभिजित चव्हाण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच मॉडर्न कन्स्ट्रक्शनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. सुरज बेनाडे यांनी विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेचे समन्वयन करून ही प्रक्रिया पूर्ण केली.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य के. आय. पाटील व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी प्रा. आर. सी. शिकेरी, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. डी. एम. पाटील आणि प्रा. ए. व्ही. हंकारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी सिव्हिल विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.