SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्टकसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक 'मॅपकॉन' अधिवेशन कोल्हापुरातस्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहनसहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादनहुपरी-कोल्हापूर मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, अन्यथा रास्ता रोकोचा इशाराचैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोर

जाहिरात

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

schedule29 Sep 26 person by visibility 187 categoryराज्य

कोल्हापूर : या ठिकाणी उद्योग वृद्धीची क्षमता मोठ्या प्रमाणावर आहे. येथील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत तसेच ज्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांकडून अद्याप निर्यात सुरू झालेले नाही अशा उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज केले.
 
हॉटेल सयाजी येथे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या रिव्हर्स बायर-सेलर मिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती प्रेरणा देशभ्रतार तसेच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे प्रादेशिक अध्यक्ष खुशवंत जैन उपस्थित होते.

 राज्यपाल म्हणाले, आज अखेर सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांची संख्या 9.61 कोटीवर पोहचली असून देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 48.58 टक्के इतका वाटा आहे. या क्षेत्रामध्ये सुमारे 42 कोटी इतक्या लोकांना रोजगार मिळतो आहे.कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आहे. देशातील उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनून आपली उत्पादने जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करून महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक गतिमान आर्थिक शक्ती केंद्रापैकी एक असल्याचे गौरवोद्गार काढले. 

गेल्या 25 -26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची सुमारे 69.9 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी एकूण वस्तू निर्यात होती. यामध्ये कोल्हापूरची निर्यात तब्बल 722 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा दोन दिवसीय संवाद (मेळावा) म्हणजे खरेदीदार (बायर) व निर्यातदार (सेलर -विक्रेता) यांच्यासाठी योग्य व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले.

व्यवस्थापकीय संचालक (MSSIDC) श्रीमती प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या,RAMP अर्थात (Raising and Accelerating MSME Performance) हा भारत सरकारचा सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून जागतिक बँकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून उद्योगांची क्षमता विकसित करणे, बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविणे त्याचबरोबर संस्थात्मक क्षमता मजबूत करणे आदी उपक्रम या RAMP द्वारे राबविले जातात. तर निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून देशाचे एकूण निर्यातीपैकी 16 टक्के निर्यात महाराष्ट्र करते तसेच या मेळाव्याचा सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून संभाव्य व्यावसायिक भागीदारांची संवाद साधावा त्याचबरोबर नव्या संधीचा शोध घेवून दीर्घकालीन व्यावसायिक संबंध निर्माण करावेत, असे आवाहन फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय यांनी केले. यावेळी राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देवून स्टॉल धारकांशी संवाद साधला.

या मेळाव्यामध्ये कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, अभियांत्रिकी उत्पादने, वस्त्रोद्योग चामड्याच्या वस्तू, कपडे व कापड, हस्तकला त्याचबरोबर चांदीचे दागिने आदी उत्पादनाचा यामध्ये समावेश आहे.राज्यातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट व्यावसायिक संपर्क साधता यावा, नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेता यावा तसेच जागतिक बाजारपेठेत प्रवेशाच्या नव-नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या खरेदीदार-विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळाव्यामध्ये 27 देशातील 52 हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी तर राज्यातील 450 हून अधिक एमएसएमईनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes