SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्टकसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक 'मॅपकॉन' अधिवेशन कोल्हापुरातस्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहनसहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादनहुपरी-कोल्हापूर मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, अन्यथा रास्ता रोकोचा इशाराचैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोर

जाहिरात

 

स्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहन

schedule29 Sep 26 person by visibility 192 categoryआरोग्य

कोल्हापूर : कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यात १७६ तर सांगली जिल्ह्यात ८ स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले.

स्वाईन फ्ल्यू हा इन्फ्ल्यूएन्झा (H1N1) विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. खोकताना, शिंकताना किंवा बोलताना हवेतून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे तसेच संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून या आजाराचा प्रसार होऊ शकतो. संक्रमित वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे साधारणतः एक ते चार दिवसांत दिसून येतात. ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा दुखणे, नाक वाहणे, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये श्वसनास त्रास किंवा निमोनियासारखी गंभीर लक्षणेही दिसून येऊ शकतात.

स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णाने इतरांशी संपर्क कमी ठेवून पुरेशी विश्रांती घ्यावी. पाणी, सूप व उकळलेले पाणी मुबलक प्रमाणात घ्यावे. ताप व अंगदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. श्वास घेण्यास त्रास होणे, सतत ताप राहणे किंवा लक्षणे गंभीर होणे आदी बाबी आढळल्यास तातडीने शासकीय अथवा खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत.

नागरिकांनी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. आजारी व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवावे, अनावश्यक गर्दी टाळावी तसेच स्वच्छ व ताजे अन्न सेवन करावे. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा. नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes